InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Agriculture

उजनी धरणातील ६५ टीएमसी पाणी गेले वाहून

सोलापूर- परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे १०० टक्के भरलेल्या उजनी धरणातून जादा झालेले ६५ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. ते पाणी पुढे कर्नाटकात गेले. विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये यातील ६० टक्के पाणी वाहून गेलेे.दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर रोजी धरणाचे दरवाजे बंद करण्यात येतात, मात्र यंदा ऑक्टोबर संपत आला तरी धरणा परिसरातून विसर्ग सुरू असल्याने धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात सरासरी १०७ टक्के पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे ऑगस्टमध्येच…
Read More...

महाराष्ट्रातील कापूस गुजरातकडे जाण्याची चिन्हे.

औरंगाबाद,- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी कापसाला प्रतिक्विंटल 500 रुपये अधिक भाव देण्याचे जाहीर केल्याने राज्यात फडणवीस सरकारसमोर नवा पेच निर्माण होणार आहे. या वर्षी कापसाचा किमान हमी भाव 4320 रुपये आहे. राज्यात 85 लाख क्विंटल गाठी कापूस उत्पादित होईल. यातील बहुतांश कापूस गुजरातला विक्रीसाठी जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे उर्वरित कापूस खरेदीचा दर येत्या काळात राज्य सरकारसमोरची डोकेदुखी असू शकेल. बुधवारपासून राज्य कापूस महासंघ 60 खरेदी केंद्र सुऊश् करणार आहे. केंद्र सरकारच्या…
Read More...

शासकीय कापूस खरेदी केंद्रे ताबडतोब सुरू करा; बाजार समिती सभापतींची मागणी

औरंगाबाद-तालुक्यात तात्काळ शासकीय कापूस व भरड धान्य खरेदी केंद्र सुरु करुन शेतक-यांची व्यापायांकडून होणारी लुट त्वरीत थांबवावी, अशी मागणी फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे यांनी केली आहे. याविषयी बोरसे यांनी तहसीलदार संगीता चव्हाण यांना निवेदन दिले.कापूस व मका खरेदी हंगाम २०१७-१८ सुरु झालेला आहे. फुलंब्री तालुक्यात बर्यापैकी कापूस व मका पिकाचे उत्पादन झालेले आहे. काही दिवसातच या पिकांची बाजारपेठेत आवक वाढणार आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र सुरु…
Read More...

‘त्या’ कारखान्यांना टाळे ठोकण्याची प्रशासनाची तयारी

सोलापूर: कामगारांचा कायदेशीर हक्क डावलण्याची भूमिका घेत कारखानदारांनी भविष्य निर्वाह निधीला (पीएफ) विरोध केला. त्यासाठी कारखाने बंद ठेवण्याचे पाऊल उचलले. त्यामुळे कामगार आर्थिक संकटात सापडले होते. आता विभागीय आयुक्त कारवाई करत कारखान्यांना टाळे ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता हेही संकट कामगारांच्याच मुळावर येणार असल्याचे दिसत आहे.कामगारांना 'पीएफ' नाकारणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्धार विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी केला आहे. याविषयी विचारले असता कारवाईसाठी…
Read More...

शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत गोंधळ असल्याच्या तक्रारी

मुंबई: राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत गोंधळ होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. या तक्रारींचे राज्य सरकारकडून त्वरेने निराकरण न झाल्यास शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.१८ ऑक्टोबर रोजी दिवाळीमध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली . त्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती…
Read More...

बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – एस. के. माळी

टीम महाराष्ट्र देशा -अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेचा, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन  सांगली जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी यांनी केले आहे.श्री. माळी म्हणाले, आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील (ज्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाचे कुठलेही महामंडळ अस्तित्वात नाही) लाभार्थींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घेता…
Read More...

२० नोव्हेंबरला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देणार :शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा: दिल्लीत समांतर संसद भरवून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यात मांडून त्यातील ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले तसेच येत्या २० नोव्हेंबरला दिल्ली येथे १० लाख शेतकऱ्यांची ताकद दाखवून देणार असल्याचा इशारा देखील शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली देशातील १८० शेतकरी संघटना एकत्र येत असून, २० नोव्हेंबरच्या राष्ट्रव्यापी शेतकरी परिषदेचं आयोजन…
Read More...

राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

पुणे: नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) रविवारी संपूर्ण उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश, गुजरातचा काही भाग, छत्तीसगड, झारखंड आणि बिहार राज्याच्या काही भागांतून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. तसेच राज्यातील उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांतून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे.मान्सून पावसाची राज्यातील उत्तर सीमा नाशिक, जळगाव, नागपूर येथे असून पुढील २ ते ३ दिवसांत पुणे, मुंबई, कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्यास वातावरण अनुकूल झाल्याची माहिती हवामान…
Read More...

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही:शिवतारे

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत प्रस्तावीत रिंग रोड मुळे शहरातील कनेक्टीव्हीटी चांगली होणार आहे. या रिंग रोड मुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरातील ट्रॅफिकही कमी होणार आहे. प्रचंड वेगाने नागरिकीकरण होत असल्यामुळे पीएमआरडीएने सुनियोजित नियोजन केले असून याचा निश्चितच नागरिकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी  अधिग्रहण करुन त्यांना विकसित प्लॉट देण्यात येतील यात कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा, जलसंधारण…
Read More...

बिगर नोंदणीकृत औषध दुकानांवर कारवाई सुरू

सोलापूर: विविध पिकांच्या वाढीसाठी खत विक्री दुकानांतून कीटकनाशके वा पिकांच्या वाढीची संजीवके विक्री केली जात आहेत. मात्र यामध्ये दुकानदारांनी बिगर नोंदणीकृत कीटकनाशकांची विक्री करू नये. अशा प्रकारची संजीवके वा कीटकनाशके विक्री होत असल्यास त्या दुकानांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यासाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी दिली. पीकवाढीसाठी विविध औषध फवारणीने विदर्भात अनेक शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर जिल्हा…
Read More...