InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Agriculture

गुजरात मधील सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला असा होणार फायदा

वेब टीम:- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकतेच देशातील सर्वात मोठ्या व जगातील दुसऱ्यां क्रमांकावर असलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण करण्यात आले. या धरणापासुन अनेक राज्यांना फायदे होणार आहेत. धरणाच्या पाण्यापासून तयार करण्यात येणाऱ्या वीज निर्मितीपैकी २७% वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. कदाचित या प्रकल्पामुळे तरी महाराष्ट्रातील अजूनही आंधारात असलेली गावे आता उजेडात येतील. या धरणावरील दोन वीज प्रकल्पांमधून आजवर 4,141 कोटी युनिट विजेची निर्मिती करण्यात आली आहे. नर्मदा नदीच्या पात्रात बनवण्यात…
Read More...

नेवासा तालुक्यातुन कर्जमाफीसाठी 58 हजार 105 शेतकऱ्यांचे अर्ज

राहुल कोळसे /नेवासा,प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच थकबाकीदार शेतकऱ्यांना यावेळी कर्जमाफी मिळणार असल्याची घोषणा महराष्ट्र शासनाने केली आहे . यावेळच्या कर्जमाफीचे वैशिष्टय म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये अनुदाप्रमाणे कर्ज माफीचा फायदा मिळणार आहे.त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी अर्ज भरले होते . यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर हाल झाले होते मात्र सर्व…
Read More...

मान्सूनचा मुक्काम लांबणीवर, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : राज्यात वरुणराजाने विश्रांती घेतली असून कोकणासह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, यंदाच्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार असून सप्टेंबर अखेरपर्यंत माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.पश्‍चिम राजस्थानातून सर्वसाधारणपणे १ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. बंगालच्या उपसागरावरून येत असलेले उष्ण वारे, वेस्टर्न डिस्टर्बन्स व वारंवार निर्माण होणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे मान्सूनच्या…
Read More...

साखर उद्योगासंबंधीचे सर्व परवाने, मान्यता ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यात सन 2017-18 चा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास आज मंत्री समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तसेच साखर उद्योगासंबंधीचे सर्व परवाने व मान्यता ऑनलाईन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची गाळप हंगाम 2017-18 च्या हंगाम नियोजन व ऊस गाळप आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक…
Read More...

चंद्रकांत दादांनी १० लाख बोगस शेतकऱ्यांचा जावई शोध कुठून लावला – धनंजय मुंडे

मुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसताना अद्याप अर्जाची छाननी झाली नसताना सरकारने 10 लाख बोगस शेतक-यांचा शोध कसा लावला असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर सरकार शेतक-यांना घाबरवीत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांचे असो की मंत्र्यांची वक्तव्य सारखीच असून ते शेतक-यांचा अवमान करीत आहेत अस देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.दरम्यान , कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील…
Read More...

कर्जास कंटाळून सांगली जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली - तासगाव तालुक्यातील अंजनी येथील शेतकऱ्याने कर्जास कंटाळून घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. जालिंदर आबासाहेब पाटील (वय ४१) असे या शेतकऱ्याचे नाव असून अंजनी येथील विकास सोसायटीचे ते माजी अध्यक्ष होते.अंजनी गावातच जालिंदर पाटील यांची दहा एकर शेती आहे. मात्र पाण्याअभावी त्यांनी केवळ साडे तीन एकर शेतात द्राक्षबाग केली होती. या द्राक्षबागेची छाटणी आवश्यक होती. परंतु पाणी नसल्याने त्यांनी द्राक्ष छाटणी लांबणीवर ढकलली होती. अशातच त्यांनी विकास सोसायटीकडून १३ लाख रूपयांचे कर्ज घेतले…
Read More...

गोरक्षकांचे काम सुयोग्य प्रक्रियेद्वारे सुरु ठेवण्याचा निर्धार

पुणे : गोरक्षकांचे काम हे खब-यांसारखे असते. ते माहिती गोळा करून पोलिसांकडे देत असतील, तर त्याला कोणत्याही न्यायालयाने प्रतिबंध केलेला नाही. कायदा हातात न घेता गुन्हे थांबविण्याचे काम सध्या गोरक्षकांकडून सुरु आहे. त्यामुळे सुयोग्य प्रक्रियेद्वारे गोरक्षकांचे काम यापुढेही चालूच राहिल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांबाबत अनेकांमध्ये समज-गैरसमज असून त्याचा खरा अर्थ गोरक्षक व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती अखिल भारत कृषि गोसेवा संघ, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष…
Read More...

ऊसाच्या अंतिम दरासाठी बुधवारी मुंबईत महत्वपूर्ण बैठक

सांगली : गतवर्षी गळीत झालेल्या ऊसाचा अंतिम दर निश्‍चित करण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी मुंबई येथे ऊस दर नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गत हंगामात गळीत झालेल्या ऊसाकरिता ७०- ३० च्या धोरणानुसार एफआरपी वगळता उर्वरित हिशेब मागणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.गतवर्षी व यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेचा करविरहीत दर प्रतिक्विंटल सरासरी ३५०० रूपयापेक्षा अधिक राहिलेला आहे. याशिवाय मळी व अन्य पूरक उत्पादनासही सहकारी साखर कारखानदारांना…
Read More...

कर्जमाफी मागणारे १० लाख शेतकरी बोगस – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अजूनही काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.मात्र ज्यांची बँक अकाऊंट बोगस आहेत, अशा शेतकऱ्यांनाच या अडचणी येत असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं. हे सरकार शेतकऱ्यांचे असून, येत्या ऑक्टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल, असं आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी दिलं.…
Read More...

कांदा आयातीच्या निर्णयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त

अहमदनगर : केंद्र सरकारने बाहेरील देशातून कांदा आयात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसू लागला आहे.15 दिवसांपूर्वी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने भाव वाढतील या अपेक्षेने कांदा साठवून ठेवलेल्या शेतक-यांना आता निम्म्यापेक्षा कमी किंमतीला कांदा विकावा लागत आहे.अवघ्या 15 दिवसांमध्ये कांद्याचे दर निम्याने खाली आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.बाहेरील देशातील कांदा बाजारात येण्याची शक्यता असल्याने व्यापारी देखील धास्तावले असून शेतक-यांकडील कांदा चढ्या दराने घेण्यास आता…
Read More...