InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Agriculture

आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

पुणे:- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि हमीभावासह विविधा मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या सुटीमुळे गुलटेकडी येथील मार्केट यार्ड बंद असल्यामुळे शहरात शेतमालाचा तुटवडा जाणवणार असल्याची चिन्हे आहेत.महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने यापूर्वी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे शहरांची दूध आणि भाज्यांची रसद तुटली होती. आंदोलन काळात भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात…
Read More...

सुमारे ५ हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्टीने वाढण्यास होणार मदत

पुणे: राज्य कृषि व पणन विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत (एमएसीपी) तयार झालेल्या १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मका उत्पादनासाठी सी.पी. सीडस(थायलंड) या मका प्रक्रिया करणाऱ्या खाजगी कंपनीशी सामंजस्य सहकार्य करार केला. एमएसीपीच्या कृषी व्यवसाय प्रोत्साहन सुविधा कक्षाची सल्लागार संस्था ग्रांट थोर्नटन यांच्या पुढाकाराने हा सामंजस्य करार करण्यात आला. सदर सामंजस्य करार होतेवेळी एमएसीपी चे सुनील पवार (प्रकल्प संचालक), डॉ भास्कर पाटील (उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ), डॉ अभय गायकवाड…
Read More...

१४ ऑगस्ट रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन

वेबटीम : शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा करा या महत्वाच्या मागणी सह इतर अनेक माग्णयांसाठी मागीलकाही दिवसात शेतकरी रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे राज्य शासनाला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र, घोषणा करताना सरकारने अनेक जाचक अटी व शर्ती लावल्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने या अटीमय कर्जमाफी विरोधात १४ ऑगस्टला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्य़ातील पालकमंत्री ऐवजी शेतकऱ्यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ध्वजारोहण करावे,…
Read More...

राहुरीतील बेकायदेशीर वखार कोणाच्या आशीर्वादाने ?

राहुरी / राजेंद्र साळवे : राहुरी तालुक्यातील वनविभागाने गरीब साधारण नागरीकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम सुरू केले आहे ,वनविभागाचे मुख्य वन अधिकारी स्वतःचे प्रशासकीय कामात किती तरबेज आहेत हे आता समोर आले आहे. शहरातील बोगस वखारी वर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा तक्रार अर्ज राजु अन्तोन साळवे यांनी वनविभागाकडे दीला आहे व तशी पोहचसुध्दा त्यांना देण्यात आली आहे. काय आहे प्रकरण ? राहुरी शहरातील मागील काही वर्षापासून मध्यवर्ती खंडोबा मळा या भागात चोरट्या पध्दतीने सर्वच प्रकारचे झाडे तोड़ुन त्याची…
Read More...

पक्ष निर्णयामुळे मी खुप दुखावलो गेलो – सदाभाऊ खोत

अक्षय पोकळे :- एकाच ताटात बसून घास खाणारे दोन नेते आज मात्र वेगळे झाले आहेत. सदाभाऊ खोत यांच्यावर पक्षशिस्त न पाळल्याबद्दल आरोप ठेवण्यात आले होते. यासाठी नेमण्यात आलेल्या ४ सदस्यीय चौकशी समितीची आज पुण्यात महत्त्वाची बैठक झाली. यावेळी त्यांच्या कामाबद्दलच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचा निर्णय चौकशी समिती अध्यक्ष दशरथ सावंत यांनी केला. चौकशी समितीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. सदाभाऊंनी आजवर केलेले काम लक्षात घेता…
Read More...

बेलगंगा सुरु झाल्यास शेतकरी वर्गाचा फायदाच

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यासह गिरणा परिसरातील जनतेचा विकास व्हावा या दृष्टीने सहकार महर्षि तथा माजी आमदार स्व.रामराव दगडू पाटील, उंबरखेडे ता.चाळीसगाव यांनी या कारखान्याची उभारणी केली. संन १९७७ साली पहिला गळीत हंगाम सुरु केला होता. त्यानंतर बरीच वर्ष कारखाना सुरळीत चालला. मात्र गेल्या ८ ते ९ वर्षापासून कारखाना वाढता कर्जाचा डोंगर व काही वेळेस ऊस ची परवड होत असल्याने लागवड कमी होणे यासह विविध कारणांमुळे कारखाना बंद पडला. मध्यन्तरी निवडणूक होऊन चित्रसेन यशवंतराव पाटील हे…
Read More...

सेतू चालकाच्या मनमानीमुळे पिकविमा भरता येत नसल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर

नेवासा / राहुल कोळसे : पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढूनही सेतू चालकाच्या मनमानीमुळे पिकविमा भरता येत नसल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील सुकळी येथील संतप्त शेतकर्‍यांनी नेवासा - शेवगाव राजमार्ग वरील कुकाणा येथे एक तास रस्ता रोको आंदोलन केले. अखेर माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या मध्यस्थीने रस्ता रोको मागे घेण्यात आला. पिक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर 5 ऑगस्ट पर्यंत शासनाने मुदत वाढवून दिली. यामुळे पिकविमा भरण्यासाठी शेतकर्‍यांनी सेतू केंद्रावर पुन्हा गर्दी…
Read More...

जळगाव जिल्ह्यात एकाही शेतक-याला १० हजारांचे पीककर्ज नाही

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत एकाही शेतक-याला शासनाने जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगामाकरिता तातडीचे १० हजारांचे कर्ज मिळालेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. आधीच थकबाकी असलेल्या शेतक-यांना आणखी १० हजार रुपये कर्ज देऊन एनपीएत वाढ होण्याचीच भीती असल्याने बँकांकडून हे कर्ज देणे टाळले जात आहे. १० हजारांच्या कर्ज वितरणासाठी शिखर बँकेकडून जिल्हा बँकेला ९.५ टक्के दराने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी शासनाने दर्शविली. मात्र या कर्जाची हमी न घेतल्याने जिल्हा बँकांचे नुकसान असल्याने जिल्हा बँकांनी हात वर…
Read More...

विदर्भ मराठवाडा दुष्काळाच्या छायेत

वेबटीम : राज्यात सध्या पावसाळा सुरु होऊन एक महिना झाला आहे. तरी संपूर्ण राज्यात काही भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यांतल्या त्यात विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने शेतीतील पिके सुकू लागली आहे तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे . तर काही शेतीतील पिके आता नांगी टाकत आहे. गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दांडी दिल्याने लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. गेल्या काही वर्षापासून असलेली सततची…
Read More...

बेलगंगा साखर कारखाना – खरीददार कंपनीकडून गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू

चाळीसगाव : बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्याने हा कारखाना घेणा-या कंपनीने तो सुरू करण्याच्या जोरदार हालचालीस प्रारंभ केला आहे. यासाठी देखभालीअंती चाचणी हंगाम घेतला जाणार आहे. चार स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येत अंबाजी ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चित्रसेन पाटील, व्हाईस चेअरमन रवींद्र्र केदारसिंग पाटील, नीलेश निकम, डॉ. अभिजित पाटील यांनी मात्र आठ वर्षांपासून बंद असलेला बेलगंगा कारखाना विकत घेऊन तो सुरू व्हावा…
Read More...