AIASL Recruitment | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

AIASL Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIR INDIA AIR SERVICES LIMITED) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एअर इंडिया एअर सर्विसेस यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (AIASL Recruitment) विविध पदांच्या एकूण 495 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये दहावी, बारावी, पदविका, मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर), अवजड वाहन चालक परवाना (HMV) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (AIASL Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (AIASL Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

http://www.aiasl.in/

महत्वाच्या बातम्या