पाक वर एअर स्ट्राइकहूनही मोठा हल्ला होऊ शकतो – राजनाथ सिंह

काश्मीरसंदर्भात पाकने भारताशीच चर्चा करावी अशी भूमिका अमेरिकेने मांडली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी जी चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीरवर होईल असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं आहे. कालका येथील प्रचारसभेमध्ये त्यांनी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला आहे.

आता पाकिस्तानशी जी पण चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच होईल असा खुलासा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. बालाकोट एअर स्ट्राइकहूनही मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो असा इशाराही सिंह यांनी यावेळी दिला आहे.आम्ही घोषणापत्रात जी वचनं दिली होती ती सगळी पाळतो आहे. आम्ही कायम देशहिताची ,देशनिर्मितीचे राजकारण करतो असंही यावेळी राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला थारा देत राहील तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीच चर्चा होणार नाही. येत्या काळात चर्चा झालीच तर ती पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर होईल इतर कोणत्याही मुद्द्यावर होणार नाही’. देश स्वतंत्र झाला तरी काश्मीरचा मुद्दा तसाच राहिला. दोन्ही देशांकडे संविधान असूनही हा तिढा सुटला नाही.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.