लीबियामध्ये हवाई हल्ल्यात ; 40 जण ठार

लीबियातील अवैध प्रवासी केंद्रावर झालेल्या हवाई हल्ल्यात 40 जणांना मृत्यू झाला आहे तर 80 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. लीबियामध्ये सध्या गृहयुद्ध सुरु आहे. हा हल्ला कोणी केला याबाबत अजून स्पष्टता नाही. स्थानिक माध्यमानुसार लीबियाची राजधानी त्रिपोली येथील तजौरामध्ये हा हल्ला झाला. लीबियाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या फोटोमध्ये हल्ल्यानंतर आफ्रिकन प्रवासी एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

रॉयटर्सनुसार सरकारी आपत्कालीन सेवेचे प्रवक्ते मालेक मर्सेक यांनी सांगितले की, या हल्ल्यात 40 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 80 लोक जखमी झालेत. त्रिपोलीमध्ये यूएन समर्पित सरकारने या हल्ल्याला खलीफा हफ्तारला जबाबदार धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा