InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

संघाचे प्रकरण अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची एआयएसएफची मागणी

नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या प्रकारामुळे संविधानातील धर्मनिरपेक्षता मान्य नसलेल्या संघाचे बाळकडू विद्यार्थ्यांना दिले जाणार असून, ते घातक आहे. त्यामुळे बी. ए.च्या अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आॅलइंडिया स्टुडंटस फेडरेशनच्यावतीने करण्यात आली.

फेडरेशनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भाजप सरकारचा शिक्षणाचे धार्मिकीकरण आणि खाजगीकरण करण्यावर जोर आहे. देश स्वातंत्र्याच्या लढ्यात कम्युनिस्टांचे मोलाचे योगदान होते. उलट संघाचे नेते क्रांतिकारकांना पकडून देण्यात आघाडीवर होते.

स्वातंत्र्यानंतर आरएसएस आणि हिंदू महासभेने ‘काळा दिन’ पाळला होता. अजूनही संघ आपल्या कार्यालयावर देशाचा झेंडा फडकवत नाही; मात्र देशविरोधी कार्य करणाऱ्या व महात्मा गांधींच्या हत्येशी संबंध असलेल्या या संघटनेच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठाने घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply