ऐश्वर्या राय गरोदर? अभिषेक-ऐश्वर्या दुसऱ्यांदा होणार आई बाबा?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या जोरदार चर्चेत आली आहे. अलीकडे ऐश्वर्याचे काही नवीन फोटो समोर आले या फोटोंना पाहून चाहते ती गरोदर असल्याचा अंदाज वर्तवत आहेत. यामुळे ऐश्वर्या चर्चेचा विषय ठरली आहे.

ऐश्वर्याचे नुकतेच नवीन फोटो समोर आले. या छायाचित्रांमध्ये ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून तिने कोणताही मेकअप केलेला नाही. यात तिचं वजन वाढलेलं दिसत आहे. याशिवाय फोटोत बेबी बंपही दिसत आहे. याचमुळे युझर्सना ऐश्वर्या लवकरच गोड बातमी देणार असं वाटत आहे. मात्र याबद्दल ऐश्वर्या किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने काहीही सांगितलेलं नाही. या फोटोमध्ये ऐश्वर्या, अभिषेक आणि मुलगी आराध्या शूटच्यावेळी सरथ कुमारच्या घरी पोहोचले त्यावेळी हे फोटो घेण्यात आले.

हे फोटो व्हायरलं होताच सोशल मीडियावर अनेक युजर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ऐश्वर्या गरेदर आहे का?’ त्याचवेळी दुसऱ्या युझरनने लिहिले की, ‘ही तर चांगली बातमी आहे की ऐश्वर्या गरोदर आहे.’

दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेकचे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना २०११ मध्ये मुलगी झाली. अभिषेक बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा