Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणेनं लेकाचं फोटो पोस्ट करत शेअर केलं नाव

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ला ऑक्टोबर महिन्यामध्ये पुत्ररत्न (Baby Boy) प्राप्त झाले होते. अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकर (Radhika Dhopavakar) ने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तर, त्यांनी आता त्याच्या मुलाचा पहिला फोटो आणि मुलाचं नाव सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

अजिंक्यची पत्नी राधिकाने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर त्यांच्या लेकाचा पहिला फोटो पोस्ट केला आहे. अजिंक्यला आर्य नावाची गोंडस मुलगी देखील आहे. अजिंक्य आणि राधिकाने आर्यासोबत त्यांच्या लेकाचं फोटो शूट केलं  आहे. राधिकाने आर्याबरोबरचा एक फोटो शेअर करत त्यांच्या लेकाचे नाव सोशल मीडियावर जाहीर केला आहे. ही पोस्ट शेअर करत असताना राधिकाने त्याला कॅप्शन दिले आहे की,”आर्याचा लहान भाऊ राघव रहाणे”. अजिंक्य आणि राधिका यांनी त्यांच्या लेकाचं नाव ‘राघव’ असं ठेवलं आहे.

प्रभू श्रीराम यांच्या नावावरून राधिका आणि अजिंक्यने त्यांच्या मुलाचे नाव ठेवलं आहे. राधिकाने सोशल मीडियावर शेअर केलेला त्यांच्या मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या फोटोवर चाहत्यांनी कमेंटच्या वर्षाव केला आहे.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे व राधिका धोपावकर यांनी 26 सप्टेंबर 2014 रोजी विवाह केला होता. लग्नाच्या पाच वर्षानंतर राधिका आणि अजिंक्यला आर्याच्या रूपात कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यानंतर आता 5 ऑक्टोबर 2022 रोजी राघवच्या रूपामध्ये अजिंक्य आणि राधिकाच्या घरी पुन्हा एकदा एका गोंडस चिमुकल्याने जन्म घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.