Ajit Pawar | अखेर मुहूर्त लागला! पुढील 24 तासात अजित पवार गटाला होणार खातेवाटप

Ajit Pawar | मुंबई: 02 जुलै रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अजित पवारांसह त्यांच्या 09 सहकाऱ्यांचा शपथविधी झाला. मात्र, अद्यापही या मंत्र्याना खातेवाटप झालेले नाही. या खातेवाटपाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

दहा दिवस उलटून गेले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार खात्यांविना आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार गटाच्या आमदारांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील 24 तासात अजित पवार गटाला खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे. या खातेवाटपाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

The Ajit Pawar group is insisting that we should have the Finance Department

अर्थ खात आपल्याकडे असावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. तर शिंदे गटानं (Eknath Shinde) यासाठी नकार दर्शवला आहे. त्यामुळे याबाबत चर्चा सुरू असून त्यावर उपाय काढला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार लपून छपून करण्याची गरज नाही. सगळ्यांना माहिती देऊनच खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं मत सत्ताधाऱ्यांनी मांडलं आहे.

दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थिती आणि मंत्रिमंडळ विस्तारावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज्य सरकारमध्ये अर्थ खात्यावरून वाद सुरू आहे. हा वाद पाहता अजित पवारांना मुख्यमंत्री करा तर अर्थ खात एकनाथ शिंदेंना देऊन टाका आणि हा तिढा सोडवा.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Y5v6cp