Ajit Pawar | अजित दादांना दाढी नसल्याने तो फिल येत नसेल; शिंदे गटाची खोचक टीका

Ajit Pawar | नाशिक: काल (21 जुन) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. नुसतीच दाढी कुरवाळत बसू नका. थोडं  काम देखील करा. मग मी तुमचं कौतुक करेल, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या टीकेला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Eknath Shinde works for 20 hours – Dada Bhuse

अजित पवारांना (Ajit Pawar) प्रत्युत्तर देत दादा भुसे म्हणाले, “सध्या महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री लाभले आहे, जे दिवसाच्या 24 तासातून 20 तास काम करतात. एकनाथ शिंदे पहिले असे मुख्यमंत्री आहे, जे एवढ्या वेळ काम करतात.”

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “जर दाढी कुरवाळायचा विषय असेल. तर एखाद्याला दाढी असेल तर त्याच्या कुरवाळल्यानं कुणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. कदाचित अजित पवारांना दाढी नसल्यामुळे त्यांना तो फील येत नसेल.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी या मेळाव्यामध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. मला विरोधी पक्षनेते पद नको. मला या जबाबदारीतून मुक्त करा. आमदारांच्या आग्रहामुळं इंटरेस्ट नसताना मी हे पद स्वीकारलं.” अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/dada-bhuse-said-that-ajit-pawar-would-not-feel-as-he-had-no-beard/?feed_id=45425

You might also like

Comments are closed.