Ajit Pawar | अजित पवारांचं जिहाद प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाले..

Ajit Pawar | पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधित कुटुंबावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली होती. या प्रकरणावर अजित पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. या प्रकरणावर चौकशी करण्यात यावी. मात्र, खोलात गेल्यावर वेगळं चित्र समोर येतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

Ajit Pawar’s reaction on Jihad case

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “लव्ह जिहाद सारख्या प्रकरणावर चौकशी करावी. त्यानंतर काय होतं ते कळतं. मात्र, या प्रकरणाची खोलात चौकशी केल्यावर वेगळं चित्र समोर येतं. सभागृहामध्ये याबद्दल बरंच काही बोललं जातं. पण प्रत्यक्षात काहीच नसतं. त्यामुळे पोलिसांनी तपास करून कारवाई करावी.”

नक्की काय आहे प्रकरण? (What exactly is the case?)

पुणे जिल्ह्यातील मंचर येथील अल्पवयीन मुलगी प्रेम विवाह करून 2019 पासून फरार होती. गोपीचंद पडळकर यांनी हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा दावा केला आहे. त्या मुलीवर अत्याचार झाल्याचं, त्याचबरोबर जबरदस्तीने बुरखा घालायला लावल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. याबाबत तक्रारीसाठी अल्पवयीन मुलीला मंचर पोलीस स्थानकात नेण्यात आलं होतं. त्यावेळी मुलीची मानसिकता अस्थिर होते. त्यामुळे पडळकर यांनी या प्रकरणाला लव्ह जिहाद म्हटलं आहे.

काल माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “द केरला स्टोरी चित्रपट पाहून आपल्याही कुटुंबातील मुलीसोबत असं काही घडलं असेल, असा तपास केल्यावर पीडित मुलगी सापडली. त्यानंतर या प्रकरणावर पोलीस तपास सुरू झाला आहे. त्यामुळे चौकशीनंतरच कळेल की हे प्रकरण लव्ह जिहाद आहे की नाही?”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/42cd2O7