Ajit Pawar | अजित पवारांची शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका; म्हणाले …

Ajit Pawar | सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी गेल्या चार- पाच दिवसांपूर्वी महानाट्य घडवून आणलं. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चना पूर्णविराम मिळाला आहे. तर राजीनामा माघारी घेत शरद पवार यांनी भाजप (BJP) विरोधात आपला पक्ष उभा राहिला पाहिजे साठी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आज ते निपाणी दौऱ्यावर आहेत. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी देखील शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले अजित पवार ( What did Ajit Pawar say)

अजित पवार यांनी सातारा येथून जाहीर सभेतून सत्ताधारी सरकारवर निशाणा साधत म्हटलं की, सत्तेत येऊन सरकारने फक्त आश्वासन दिली आहेत. राज्यातील अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यानंतर दुसरे प्रकल्प आणू म्हणता पण यांच्यामध्ये प्रकल्प आणण्याची धमक नाही. तसचं आतापर्यंत त्यांनी अनेक गोष्टीत फक्त गाजर दाखवण्याची काम केली आहेत. राज्यातील तरुण बेरोजगारीने खचला आहे तर अनेक रोजगार राज्यातील परराज्यात जात आहे परंतु हे सरकार फक्त त्याकडे बघत बसलं आहे. कारण त्यांच्यात धमक नाही. फक्त सरकार नोकरी लावणार म्हणून सांगायचं. अशा शब्दात अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.

तसचं अजित पवार बोलताना पुढे म्हणाले की, गेल्या दोन ते तीन महिन्यापासून राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे. नुसत म्हटलं जातं आमचं सरकार गोरगरिबांचं आणि शेतकऱ्याचं सरकार आहे परंतु, आजून पंचनामे होत नाहीत ना मदत शेतकऱ्यांना मिळते. असे अनेक प्रश्न आज राज्यासमोर आहेत. पण मंत्रालयात कोणी बसायला तयार नाही. मंत्रालयात कोण किती दिवस असतात याची माहिती घ्या. महाराष्ट्राची आर्थिक दृष्ट्या पीछेहाट का झाली आहे याचं उत्तर सरकारने दिल पाहिजे. असा प्रश्न देखील त्यांनी सभेदरम्यान उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

You might also like