Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर नाना पटोलेंचा पलटवार ; म्हणाले..

Ajit Pawar | मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अनेक चर्चना पाहायला मिळत आहेत. लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एक वक्तव्य करत म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पलटवार करत अजित पवारांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले (What did Nana Patole say)

नाना पटोले म्हणाले की, अजित पवार खोटं बोलत आहेत. जेव्हा मी राजीनामा दिला होता तेव्हा अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आम्ही अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटलो. आत्ताच राजीनामा देऊ नका, असं ते म्हणाले होते. परंतु त्यांना याबाबद्दल पूर्ण माहिती होती. ते आता खोटं बोलत आहेत. मी अध्यक्ष नव्हतो तर उपाध्यक्ष त्यांचा होता. त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. अशा शब्दात नाना पटोले यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होत की, त्यावेळी महाविकास आघाडीच्या विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला. एकतर तो द्यायला नको होता. जर दिलाच होता तर लगेच विधानसभा अध्याक्षांची निवडणूक लावून तो विषय संपवला हवा होता. मी कोणाला दोष देत नाहीये. पण आमच्या सगळ्यांकडून, महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने संपवला असता तर विधानसभेचे अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या असं अजित पवार यांनी म्हटलं होत.

महत्वाच्या बातम्या-