Ajit Pawar | अजित पवारांच्या हस्ते ‘आठवणी’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

टीम महाराष्ट्र देशा: आगामी ‘आठवणी’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) आणि सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अजित पवार व इतर मान्यवरांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी  चित्रपटाला शुभेच्छा दिल्या व भविष्यात असे उत्तमोत्तम चित्रपट येवोत अशी इच्छा व्यक्त केली.

सिद्धांत अशोक सावंत ( Ashok Sawant ) यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरवरून त्याची प्रगल्भता लक्षात येते. दोन पिढ्यांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकथेची गोष्ट पत्रावाटे उलगडून दाखवणारी ही कथा आहे. त्यामुळे आजची तरूणाई आणि वयस्कर असे सगळेच या चित्रपटाच्या आठवणीत रमून जातील. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Dr. Mohan Agashe ), ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी ( Suhas Joshi ) या पोस्टरवर झळकत आहेत, तर त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत सुहृद वार्डेकर ( Suhrud Wardekar ) आणि वैष्णवी करमरकर (Vaishnavi Karmarkar ) दिसत आहेत.

याशिवाय अभिनेता निनाद सावंत (  Ninad Sawant ) साहाय्यक भूमिकेत दिसेल. नात्यांची गुंतागुंत, एकमेकांवर असलेलं निर्व्याज प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रती असलेली ओढ या पोस्टरमधून दिसून येते. त्यामुळे या चित्रपटाचे कथानक नक्की काय असेल हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/athwani-movie-poster-release-by-ajit-pawar/?feed_id=45309