Ajit Pawar | अजित पवारांना अर्थ खात, तर गटातील इतर नेत्यांना मिळाले ‘हे’ खाते

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधी होऊन साधारण दहा दिवस उलटून गेले आहे. मात्र, अद्याप त्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नव्हतं. परंतु, आज रखडलेलं मंत्रिमंडळ खातेवाटप झालं आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar has got the finance portfolio

एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बैठकीनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खात मिळालं आहे.

अजित पवार गटाला (Ajit Pawar) खातेवाटपामध्ये महत्त्वाचे खाते मिळाले आहे. अजित पवार गटाला खालील खाते मिळाले आहे.

अर्थ आणि नियोजन – अजित पवार (Ajit Pawar)

कृषी – धनंजय मुंडे (Dhananjay Munde)

महिला व बालविकास – अदिती तटकरे (Aditi Tatkare)

मदत पुनर्वसन – अनिल पाटील (Anil Patil)

सहकार – दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil)

अन्न आणि नागरी पुरवठा – छगन भुजबळ (Chagan Bhujbal)

अन्न व औषध पुरवठा – धर्मरावबाबा आत्रम (Dharmaraobaba Atram)

क्रीडा – संजय बनसोडे (Sanjay Bansode)

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांकडं (Ajit Pawar) अर्थ खात होतं. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी देत नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार भाजपसोबत गेले होते.

त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यानंतर पवारांना अर्थ खात देण्यात आलं आहे. यानंतर शिंदे गट काय भूमिका येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं  आहे.

अजित पवार गट (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानं शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

त्याचबरोबर अर्थ खात अजित पवारांकडे जाऊ नये, असं मत शिंदे गटातील काही आमदारांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता अर्थ खात अजित पवारांकडे गेल्यावर शिंदे गटातील आमदार काय प्रतिक्रिया देतील? हे पाहण्यासारखे असेल.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XQZB5r

You might also like

Comments are closed.