Ajit Pawar | अजित पवारांनी निधी वाटपामध्ये भेदभाव केला – यशोमती ठाकूर
Ajit Pawar | मुंबई: अजित पवार निधी वाटपामध्ये भेदभाव करतात, असं म्हणत शिंदे गटातील काही आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. त्यानंतर भाजप-शिंदे सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यशस्वीरित्या वर्षभर सरकार चालवलं.
एका वर्षानंतर अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत सामील झाले. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांकडे अर्थ खात देण्यात आलं. त्यानंतर अजित पवारांच्या जुन्या तक्रारी पुन्हा एकदा नव्यानं समोर आल्याचं दिसत आहे.
अजित पवारांना अर्थमंत्री पद स्वीकारून साधारण दोन आठवडे झाले आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी दिला आहे.
त्याचबरोबर त्यांनी शिंदे गटातील आमदारांना देखील चांगला निधी उपलब्ध करून दिला. मात्र, पवारांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना पुरेसा निधी दिला नसल्याचा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केला आहे.
Ajit Pawar has given huge funds to NCP MLAs – Ajit Pawar
अजित पवारांनी त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरघोस निधी दिला आहे. परंतु आम्हाला काहीच निधी दिला नाही.
त्यांनी फक्त काँग्रेसच्या काही निवडक आमदारांनाच निधी दिला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. आम्हाला निधी न देण्याचं काय कारण? असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अजित पवार यांना अर्थ खात देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटातील काही आमदारांनी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, तरीही त्यांनाच अर्थ खाते देण्यात आलं.
त्यानंतर निधीवाटपाच्या वेळी अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदार नाराज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत निधी वाटप केल्याचं दिसून आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही – आदित्य ठाकरे
- Sanjay Raut | संजय राऊतांनी ठरवलं असतं तर अजितदादा 2019 ला मुख्यमंत्री झाले असते – अनिल पाटील
- Eknath Shinde | कसलं ट्विट आणि कसला भूकंप? मोदी-शिंदेंच्या भेटीचं कारण आलं समोर
- Nana Patole | राज्य सरकार सध्या हवेत असून खाली यायला तयार नाही – नाना पटोले
- Sanjay Raut | “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मिळून शिंदे गटाचा मस्त कार्यक्रम…”; संजय राऊतांचं मोठं विधान
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3O7XN3P
Comments are closed.