Ajit Pawar | अजित पवारांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

पुणे : बारामतीत माझं काम बोलते. त्यामुळं तुम्ही बारामतीची काळजी करु नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कोण असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. पुण्यातील विविध मानाच्या गणपती बाप्पाचे अजित पवार यांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपतीला अभिषेक करुन आरती केली आणि गणरायाला प्रार्थना केली.

पुण्यातील विविध मानाच्या गणपती बाप्पाचे अजित पवार यांनी आज दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बाप्पाकडे काय मागणं केले असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, बाप्पाकडे काही मागणं केलं नाही. भक्तीभावानं बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. प्रत्येकवेळी बाप्पाकडं मागणं केलेचं पाहिजे असे नाही. असेही अजित पवार म्हणाले. मनमोकळेपणानं दर्शनाला जावं, सारखेचं त्यांना साकडं घालून त्यांना अडचणीत कशाला आणायचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.