Ajit Pawar | अजित पवार अडचणीत येणार! ‘या’ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून होणार चौकशी

मुंबई : 2001 ते 2011 या काळात 23 सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेने तारण न देता कर्ज दिलं असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. यानंतर, शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता. अशातच दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या या अहवालानंतर आता पुन्हा शिखर बँक घोटाळ्याची फाईल उघडली जाणार असून राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. एवढच नाही तर त्यांच्यासह अनेक लोकांच्या चौकश्या होतील अशी देखील दाट शक्यता आहे.

अजित पवार यांची ईडी कडून होणार चौकशी –

अजित पवार यांची ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह 72 संचालकांची देखील चौकशी होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. तसेच ईडीनं कोर्टात सादर केलेल्या अहवालामध्ये पुरावे असल्याचं देखील म्हटलं आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांना उत्तर सादर करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले होते. या प्रकरणी 18 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कर्जवाटप प्रकरणी कर्जवसुली चुकवली, असा आरोप करण्यात आला होता. माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना हे कर्ज देण्यात आले असल्याचाही आरोप करण्यात आला होता. तसेच नेत्यांनी स्वतःच्या संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत फायदा घेतल्याचा देखील आरोप होता. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनंतर अजित पवार अडचणीत येणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.