Ajit Pawar | अजित पवार भाजप मध्ये जाणार का? पवारांनीच दिले धडाकेबाज उत्तर

Will Ajit Pawar join BJP? Pawar himself gave a bold answer

Ajit Pawar | मुंबई : आज (1मे) महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन आहे. तर महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. तर या सभेला आज महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांनाच लक्ष लागलं होतं. तसचं गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. तर विरोध पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या तर आजच्या सभेत अजित पवार याबाबत नक्की काय भूमिका मांडणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं होत. अजित पवार यांनी महविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला जाण्यापूर्वी मुंबईतील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बिकेसी मैदानावर उपस्थित राहिले आहेत.  त्यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारचा देखील समाचार घेतला आहे.

वर्जमूठ सभेत काय म्हणले अजित पवार (What Ajit Pawar said in boycott meeting)

महाराष्टाचं हित जपण्याची धमक आमच्यात आहे. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी भिडणाऱ्या मविआच्या सभेला एवढ्या प्रचंड संख्येने आपण जमलात यासाठी स्वागत करतो. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे या दिनाच्या शुभेच्छा देतो. तसचं मुंबई महाराष्ट्राची राजधानी असली तरी ती सहजासहज मिळाली नाही. त्यासाठी खूप लोकांनी बलिदान दिलं आहे. 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राचा यशस्वी कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला. याचप्रमाणे मुंबई आणि मराठी माणसासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काम केलं. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही अस म्हणतं त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वाक्याला अधोरेखित केली आहे. तर हे सरकार दगाफटका करून सत्तेत आलं असून राज्यातील जनता ही त्यांना धडा शिकवणार असल्याचं अजित पवार म्हणाले. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटलं, तरी यांना जनाची नाही तर मनाचीही लाज नाही. चिथावणीखोर वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली, पण त्यांना काहीच वाटत नाही. पवारांनीच उत्तर दिले.

दरम्यान, अजित पवार म्हणाले की, काही लोकांना फोडण्याचं राजकारण येत आणि ते महाराष्ट्रात झालं देखील परंतु जर अशाप्रकारचं राजकारण होत असेल तर संविधान राहणार आहे का? याचा विचार आपण केला पाहिजे असं देखील अजित पवार म्हणाले. शिंदेंवर देखील त्यांनी टीका केली. यावेळी अजित पवार म्हणाले शिंदे – फडणवीस सरकार काय करत त्याच काम आहे जनतेचे प्रश्न सोडवणे. परंतु त्यांना बाकीच्या कामांमध्ये जास्त रस आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पूर्ण चिंद्या उडाल्या आहेत. याला जबाबदार कोण असा सवालही सरकारला विचारला आहे. या सरकारने फक्त सर्वसामान्याचं सरकार म्हणून बोबाटा या शिंदे- फडणवीस सरकारने केला आहे. आपले मुख्यमंत्री घोटाळा करूनच मुख्यमंत्री झालेत . गेल्या काही दिवसांपूर्वी देखील एमपीएससी च काहीतरी वेगळं त्यांनी केलं. आहो जर नीट माहिती नसेल तर नोट काढून बोला चुकीच कश्याला बोलता अशा शब्दात एकनाथ शिंदेंना अजित पवारांनी सुनावलं.

 

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.