Ajit Pawar | अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब, नक्की प्रकार काय?

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चां राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया (Social media) प्रोफाईलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेला फोटो हटवला आहे.

अजित पवार यांच्या प्रोफाईलवरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब (NCP logo missing from Ajit Pawar’s profile)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक आणि ट्विटर वॉलपेपरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचा फोटो होता. हा फोटो अजित पवार यांनी कायमस्वरूपी डिलीट केला आहे. अजित पवार यांनी हा फोटो डिलीट केल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क आणि वितर्क लावले जात आहे.

Ajit Pawar | अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल वरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब, नक्की प्रकार काय?
Ajit Pawar | अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल वरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब, नक्की प्रकार काय?

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) भाजप सोबत 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार, अशा चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असताना पवार यांनी सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा फोटो डिलीट केल्यामुळे या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे. राष्ट्रवादीचा वॉलपेपर डिलीट करून अजित पवार पक्ष सोडणार असल्याचा इशारा देत आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

या चर्चांवर अजित पवार यांचे उत्तर (Ajit Pawar’s answer to these discussions)

सोशल मीडिया प्रोफाईलवरून राष्ट्रवादीचा फोटो हटवल्यानंतर माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरू आहे, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच असणार, असे देखील पवार म्हणाले आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक चढ-उतार आले आहे. मात्र, सध्या आमच्याबद्दल आणि पक्षाबद्दल जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

You might also like

Comments are closed.