Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यास तयार ; तर पवारांसमोरच अनेकांना झापलं !

Ajit Pawar | मुंबई : जेव्हापासून राष्ट्रवादी काँगेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे तेव्हापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर या निर्णयानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या संबंधात विरोध न करता कार्यकर्ते आणि नेत्यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याची स्वीकार करावा अशी भूमिका घेतली आहे. यामुळे अजित पवार हे अध्यक्षपदासाठी सज्ज असल्याचं बोललं जातं आहे. म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापल ( Ajit Pawar On workers)

कार्यकर्त आक्रमक घोषणा देत असल्याने अजित पवारांनी त्यांच्या शैलीत झापलं. ये तू गप रे, तुलाच फार कळत का? असं अनेकांना म्हणत होते. ये संजय तू आता बास कर (बहुतेक संजय बनसोडे असावेत). तुम्हाला साहेबांना त्रास द्यायचा आहे, असं म्हणत त्यांनी सुनावल. तसचं शरद पवार यांचा राजीनामा आता कार्यकर्त्यांनी स्वीकारावा अस त्यांनी ठाम त मांडल तर डोळ्यादेखत पक्षाचा नवीन अध्यक्ष तयार होईल, अशी रोखठोक भूमिका अजितदादांनी मांडली. हे कधी ना कधी होणारच होते, इतक्या स्वच्छ शब्दांत अजितदादांनी कार्यकर्त्यांना आपल्या भावनांना आवर घालण्याचा एक प्रकारे दम दिला. अजितदादांच्या भूमिकेशी फक्त प्रफुल्ल पटेल सहमत होते. आम्ही कार्यकर्त्यांच्या मनानुसारच निर्णय घेऊ, असं सांगत समजूत घालण्याचा पटेल यांनी प्रयत्न केला. पण कार्यकर्ते त्यांना जुमानत नव्हते. शेवटी अजित पवार यांनीच साहेबांना आता जाऊ द्या, अशा कठोर शब्दांना झापल.

दरम्यान, सुप्रिया सुळे शांत बसून सगळं पाहत होत्या. कधी त्या हसत होत्या. पवार यांच्या शेजारी प्रतिभा पवार होत्या. त्या देखील कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि भाषणे ऐकून गालात हसत होत्या. एका घोषणेवर त्यांनी डोक्यावर हात लावून हे थांबवा, अस सुचविले. प्रतिभा पवार यांच्या उजव्या हाताला अजित पवार बसले होते. त्यांच्याशी कोणताही तणाव न घेता प्रतिभा पवार बोलत होत्या. प्रतिभा पवार यांच्या मागे सुनील तटकरे उभे होते. त्यांच्याही कानात प्रतिभाताई वारंवार सांगत होत्या. शरद पवार हे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार, याची पूर्वकल्पना अजित पवार यांना होती. अस अजित पवार यांनी बोलून दाखवला आहे. हा निर्णय एक मे रोजी होणार होता. पण या तारखेला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार होती. यामुळे हा निर्णय दोन मे रोजी म्हणजे आज जाहीर करण्याचं ठरल असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. तर या सर्व गोष्टींवरून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी बसायला सज्ज असल्याचं बोललं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.