Ajit Pawar | अधिवेशानात अजित पवार बोलताना भाजप आमदार मध्येच बोलले; पवारांची हातवारे करत फडणवीसांकडे तक्रार

Ajit Pawar | मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. विधानसभेत अधिवेशन सुरु आहे. अशात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) बोलत असताना भाजप आमदार मध्येच बोलले, यावर अजित पवारांनी त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. अजित पवार अधिवेशनामध्ये प्रश्न क्रमांक ३ मुद्द्यावर बोलण्यास सुरवात करणार तोच विरोधी पक्षातील आमदारांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला त्यावर अजित पवार तात्काळ भडकले. आणि देवेंद्र फडणवीसांकडे संबंधितांची तक्रार केली.

Ajit Pawar complained about BJP MLA’s to Devendra Fadnavis

“नाही… ठरलंय आता प्रश्न क्रमांक ३…देवेंद्रजी या लोकांना सांगत जा, माहिती नसतं, क्रिकेटच सारखं डोक्यात असतं. सारखं चौकार षट्कार, चौकार षट्कार” असं म्हणत अजित पवारांनी हातवारे करत विरोधकांची तक्रार फडणवीसांकडे केल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर अजित पवारांनी पुढील मुद्द्यावर बोलण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान, अजित पवार सभागृहामध्ये वारंवार शिस्तबद्धतेवरुन विरोधक असो वा आपल्या पक्ष किंवा मित्रपक्षातील नेते असो, बेशिस्तपणा दिसला की संबंधित नेत्याला अजित पवार काहीही विचार न करता खडसावताना नेहमी पहायला मिळतात. कालही सभागृहामध्ये विरोध पक्षातील आमदार, मंत्री अनुपस्थित असल्याने आणि सभागृहाचे कामकाज उशिरा सुरु झाल्याने अजित पवार सत्ताधाऱ्यांवर चांगलेच आक्रमक झाले होते.

महत्वाच्या बातम्या-