Ajit Pawar | “अमित शाह आणि बोम्मईंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं ते जाहीर करा”; अजित पवार यांची मागणी

Ajit Pawar | नागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विधान भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले , “काही दिवसांआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली.यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित होते. या बैठकीत सीमाप्रश्नावर चर्चा झाली.”

“या बैठकीनंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना अडवण्यात येणार नाही, असं सांगण्यात आलं. पण आता राज्यातील नेत्यांची अडवणूक केली जातेय. त्यामुळे या बैठकीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी”, अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर सांगायाचं समंजस्याची भूमिका घेऊ. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागणार आहे. मात्र, बेळगावात मराठी लोकांची धरपकडं सुरु करायची. तिथले मुख्यमंत्री वेगळी भूमिका का घेतात?”, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.