Ajit Pawar | “आता मी अमृता वहिनींनाच सांगणार आहे…”, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी
Ajit Pawar | नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या महिलांच्या संख्येवर प्रश्न उपस्थित केले.
अजित पवार म्हणाले, “सध्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही अशी नामुष्की सरकारवर ओढावली आहे. सरकारला एक महिला मंत्री नेमता येत नाही हा तर महिलांचा अपमान आहे. मी आता तर अमृता वहिनींनाच फोन करुन सांगणार आहे की यांच्याकडे बघा जरा”
अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. काहीतरी करा रात्रीच्या रात्री दिल्लीला फोन लावा आणि उध्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा, असा चिमटा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला काढला.
अजित पवार म्हणाले, सरकार येऊन सहा महिने लोटले तरी अनेक खात्यांना मंत्री यांना मिळेत नाहीत. अनेक कामे रखडली आहेत. आता कुणी कितीही गप्पा केल्या तरी भाजपमध्ये देवेंद्र फडणवी सर्वात ताकदवान नेते आहेत. भाजपच्या मंत्र्यांना काही काम सांगितलं की फडणवीसांना विचारुन सांगतो असे उत्तर मिळते.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Kolhe | काही क्षणात ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यात पडद्यामागे काय घडतं? पाहा VIDEO
- Health Care | जास्त पाणी प्यायल्याने शरीराला होऊ शकतात ‘हे’ नुकसान
- Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा दिलासा! सुटकेचा मार्ग मोकळा, उद्या येणार तुरुंगातून बाहेर
- KL Rahul | 2023 विश्वचषकामध्ये केएल राहुलच्या ऐवजी ‘हा’ खेळाडू असू शकतो सलामीवीर, ब्रेट ली म्हणाला…
- MPSC च्या ४३० जाहिराती प्रसिद्ध, मुलाखत प्रक्रिया लवकरच – दीपक केसरकर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.