Ajit Pawar | “आमचा नेहमी पाठिंबा…”; नोटबंदी प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | कोल्हापूर: भारतीय रिझर्व बँक (RBI) ने दोन हजार रुपयांच्या नोटावर बंदी घातली आहे. ही बंदी घालताना नोटा बदलण्यासाठी सरकारकडून सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोटबंदी प्रकरणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकारची आर्थिक शिस्त दिवसेंदिवस बिघडत चालली असल्याची टीका अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

नोटबंदी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “काय चाललय हे? काल फतवा काढला दोन हजार रुपयाची नोट बंद. यापूर्वीही नोटबंदी करण्यात आली होती. त्यावेळी दोन हजाराच्या नवीन नोटा बाजारात आणल्या होत्या. मात्र, काही वर्षात पुन्हा ही नोटबंदी आली. देशहितासाठी सरकार काही निर्णय घेत असेल तर त्याला आमचा नेहमी पाठिंबा आहे. परंतु, मोदी सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे, ते आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने घेतलेले नाही.”

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “सरकार म्हणते, नोटबंदी केल्यामुळे काळा पैसा बाहेर येईल. तसं झालं तर चांगलंच आहे. मात्र, महिलांनी कुठेतरी जपून ठेवलेल्या नोटा असतात. त्या आत्ता त्यांना बदलाव्या लागणार आहेत.”

दरम्यान, नोटबंदी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “हा शासनाचा धरसोडपणा आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती. कधीही आणायचं आणि कधीही बंद करायचं. जेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या तेव्हा ते एटीएम मशीनमध्ये जात नव्हत्या. म्हणजे त्या नोटा एटीएममध्ये जातात की नाही हे देखील तपासलं गेलं नव्हतं. हे असे निर्णय देशाला परवडणारे नसतात.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MLLtXy