Ajit Pawar | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे विधान खपवून घेणार नाही”; अजित पवार संतापले 

Ajit Pawar | पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून आपल्याकडे असणारी गावे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही याचा निषेध करतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले आहे ते जनतेला आवडलेले नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही”, असा इशारा अजित पवार यांनी दिलाय. ते पुढे म्हणाले,  कर्नाटकचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे आहेत. यावर एकत्र बसून महाराष्ट्राबद्दल काय नक्की भूमिका आहे, हे सरकारने ठोसपणे जनतेला सांगितले पाहिजे.”

त्याचबरोबर जत तालुका सांगली जिल्ह्यात आहे. त्यात जत तालुक्यात कानडी शाळा सुरू आहेत. हे महाराष्ट्राचे अपयश आहे. त्याठिकाणी मराठी शाळा मोठ्याप्रमाणावर बांधायला हव्या होत्या. याला सरकारसोबत आम्हीही जबाबदार आहोत. बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ? –

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटक सरकारने दावा केला आहे. 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्राने गांभीर्याने विचार करावा असेही बोम्मई यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावे पाण्याच्या प्रश्नावर कर्नाटकात सामील होऊ इच्छित असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जत तालुक्यांकडे कर्नाटकची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.