Ajit Pawar | “कोण संजय राऊत ?”; अजित पवारांचा प्रश्न!

Ajit pawar | पुणे : आज (21 एप्रिल) ला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) हे दिवसभर पुणे दौऱ्यावर आहेत. हा दौरा पूर्वनियोजित असल्याने विविध ठिकाणी ते भेटी देणार आहेत. आज सकाळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अजित पवार यांनी पुन्हा संजय राऊतांना (Sanjay Raut) डिवचल आहे. याचप्रमाणे त्यांनी अदानी- पवार भेटीबद्दल देखील भाष्य केलं आहे.

कोण संजय राऊत: अजित पवार (Who is Sanjay Raut: Ajit Pawar )

माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना पत्रकारांनी संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला त्यावर अजित पवार यांनी कोण संजय राऊत?असं उत्तर देत पुन्हा राउताना डीवचल आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, याआधी देखील मी कोणच नाव घेतलं नव्हतं. कोणाच्या अंगाला का लागाव असा खोचक टोला देखील लगावला आहे. तर मी माझा पक्ष आणि आमच्या संबंधात बोललो होतो. अशा शब्दात अजित पवारांनी राऊतांना डीवचल आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अदानी आणि शरद पवार यांची भेट झाली याबाबत देखील त्यांनी भाष्य केलं. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार अदानींना भेटायला गेले नव्हते तर अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली. जर पुढे जाऊन एकाद्या कोणत्याही व्यक्तीवर आरोप झाला आणि राजकीय क्षेत्रातील कोणी व्यक्ती आतील तर त्या आरोपाच्या मध्ये कोणी कोणाशी भेटावं काय बोलावं याबाबत मला महित नाही. परंतु अदानी वरचा आरोप आजून तरी सिद्ध झाला नाही असं देखील अजित पवार म्हणाले. जी समिती नेमली आहे.ती याबाबत चौकशी करेल यामुळे विनाकारण कोणीही काहीही बोलू नये. असं देखील अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-