Ajit Pawar | खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे, अजित पवार गटाला मिळणार ‘ही’ खाती
Ajit Pawar | मुंबई: अजित पवार काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून खातेवाटपाची वाट बघितली जात होती. आज या नवीन मंत्र्यांचं खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Important portfolio will go to Ajit Pawar group
अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे महत्त्वाची खाती जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे पोहोचलेली असून थोड्याच वेळात ते त्यावर सही करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यपाल लवकरच ही यादी जाहीर करतील, असही अजित पवारांनी सांगितलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार अजित पवार गटाला (Ajit Pawar) खालील खाते मिळू शकतात.
अर्थ आणि नियोजन – अजित पवार (Ajit Pawar)
महिला व बालविकास – अदिती तटकरे (Aditi Tatkare)
सहकार – दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)
वैद्यकीय शिक्षण – हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)
अन्न व नागरी – छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दररोज बैठका होत आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला नसल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र
- Eknath Shinde | शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार? राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
- Balasaheb Thorat | “काहीतरी शिजत आहे, याचा वास…”; अजित पवारांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान
- Nitesh Rane | आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात – नितेश राणे
- Uddhav Thackeray | ठाकरे-शिंदे पुन्हा येणार आमने-सामने! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा मेळावा
Original NEWS SOURCE – https://bit.ly/46LoT9g
Comments are closed.