Ajit Pawar | जखमींवर सरकारी खर्चानं उपचार तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा
Ajit Pawar | रायगड: रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड (Irshalgad Landslide) कोसळली आहे. या दुर्घटनेत 50 ते 60 घरांची ही वस्ती अख्खी मातीच्या ढिगार्याखाली गेली आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
The people injured in the Irshalwadi Landslide will be treated at government expense
रायगडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळीच मंत्रालयात जाऊन आपत्कालीन नियंत्रण कक्षाची सूत्रे हातात घेतली आहे.
त्यानंतर त्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांवर सरकारी खर्चानं उपचार केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी खंत व्यक्त केली आहे. ट्विट करत ते म्हणाले, “रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. परंतु पाऊस सतत पडत असल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.
जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. परंतु पाऊस सतत पडत…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 20, 2023
19 जुलै रोजी रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली (Ajit Pawar) आहे. वस्तीतील लोक झोपेत असताना त्यांच्यावर हे मोठं संकट कोसळलं आहे. दुर्घटनेनंतर वस्तीतील 50 ते 60 घर अख्खी मातीच्या ढिगार्याखाली गेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | “माझी राज्य शासनाला विनंती आहे की…”; इर्शाळवाडी घटनेवर शरद पवारांची प्रतिक्रिया
- Nilesh Rane | फक्त फोन करून किंवा सूचना देऊन काही होत नाही; निलेश राणेंची अजित पवारांवर खोचक टीका
- Devendra Fadnavis | इर्शाळवाडी घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…
- Amit Shah | इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत अमित शाहांचं ट्विट, म्हणाले…
- Eknath Shinde | रायगडच्या इर्शाळवाडीत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3rCDAvl
Comments are closed.