Ajit Pawar | जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगला परिसरात झळकले बॅनर्स

Ajit Pawar | मुंबई: उद्या (22 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगला परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले आहे.

या बॅनर्सवरील मजकूर बघून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सलीम सारंग यांनी हे बॅनर्स लावले आहेत.

सलीम सारंग यांनी लावलेल्या बॅनर्सवरील मजकूर वाचून राजकीय वर्तुळात खळबळ झाली आहे. ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार’ (Ajit Pawar) असं या बॅनर्स वर लिहिण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्याच्या परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

Ajit Pawar is the future Chief Minister of the state – Sanjay Raut 

दरम्यान, या बॅनर प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “अजित पवार (Ajit Pawar) लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे आणि हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो.

कारण मलाही राजकारण कळत. राजकारणात काय घडामोडी घडत आहेत त्या कळतात. त्यावरून अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे. अजित पवारांचं भविष्य लवकरच जवळ येत आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “अजित पवार (Ajit Pawar) लवकरच मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला जर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले असतील तर ते सत्य आपण स्वीकारायला हवं.”

अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता अजित पवारांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणावर भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3rAvV0C

You might also like

Comments are closed.