Ajit Pawar | “जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे”; ‘महामोर्चा’च्या सभेतून अजित पवारांचा चंद्रकात पाटलांवर हल्लाबोल

Ajit Pawar | मुंबई : भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आज महामोर्चाचं आयोजन केलं आहे. क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.  या मोर्चासाठी महाविकास आघाडीचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी आयोजित सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील  विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “चुकीचे विधान एखाद्या वेळेस होऊ शकते, त्यानंतर माफी मागणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही आपली पंरपरा आहे. मराठी माणसावर तसे संस्कार झाले आहेत. मात्र, आज तसे होताना दिसत नाही.”

“राज्यपाल बोलल्यानंतर दुसरे मंत्री बोलतात. कोणी महापुरुषांच्या महान कार्याला भिकेची उपमा देतात. जनाची नाही तर किमान मनाची लाज वाटायला पाहिजे, असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. शिवराय आपले दैवत आहेत. शाहू, फुले आंबेडकर आपला अभिमान असताना त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करण्याचे काम कशासाठी सुरू आहे? कोण यामागे सुत्रधार आहे, याच शोध घेतला पाहिजे”, असेही ते म्हणाले.

“राज्यभरातून मोठ्या प्रमाणात आज कार्यकर्ते मोर्च्यासाठी दाखल झाले आहेत. मुळात ही वेळ यायला नको होती. गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत जी अपमानस्पद विधानं केली जात आहेत, त्याला कुठं तरी विरोध केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी बोलताना मांडली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.