Ajit Pawar | एकबाजूला काल (11मे ) राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाला. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांना आयएल अँड एफएस या कंपनीच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून ( ED) नोटीस बजावण्यात आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत आता विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना याबाबत मला माहिती नाही, माझा आणि जयंतरावांचा कॉन्टॅक्ट झाला नसल्याचं म्हटलं आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वांचं पवार आणि पाटील यांच्यातील शीतयुद्ध माहीतच आहे त्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत.
काय म्हणाले अजित पवार (What did Ajit Pawar say)
अजित पवार ( Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की, गेल्या दोन दिवसांपूर्वी फलटच्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला आमची भेट झाली होती . त्यानंतर माझा आणि जयंतरावांचा काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. यामुळे मला याची माहिती नाही. तसचं अशी चौकशी आमची देखील अनेक वेळा झाली आहे . याआधी देखील अशा नोटिसा लोकांना आलेल्या आहेत. इडी,सीबीआय या सरकारी संस्था आहेत. त्याच काम आहे चौकशी करणं. या संस्था त्याच काम करत आहेत. यामुळे जर त्यांच्याकडून चौकशीसाठी नोटीस आलं असेल तर त्याला उत्तर देनं ज्याला नोटीस आलीय त्याचं काम आहे . यामुळे जयंत पाटील उत्तर देतील. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, अजित पवारांना खडा ना खडा राजकारणातला माहित असतो. पण अजित दादा यांना जयंत पाटीलांना ईडीची नोटीस आली आहे या बद्दल माहित नाही यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच स्वपक्षात काय चाललेलं हे पवारांना माहीत नाही. असं देखील बोललं जातं आहे. तसचं जयंत पाटील यांनी इडीला विनंती पत्र लिहुन चौकशीसाठी हजर राहण्याची मुदत वाढवून द्यावी असं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Nitesh Rane | संजय राऊतांना अजून अक्कलदाड आली नाही; नितेश राणेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र
- Chitra Wagh | पाटलांच्या इशा-यावरून बावळटबाई, नाचxxx; घुंगरू वाजवू नका…तमाशा चालणार नाही – चित्रा वाघ
- Anil Parab । सुनील प्रभू यांचाच व्हिप सर्वांना लागू होणार ;अनिल परबांचा दावा
- Chandrashekhar Bawankule | संजय राऊत आंघोळीचा साबण काँग्रेसचा तर पावडर राष्ट्रवादीची वापरतात तर राणे त्यांना धुवून काढतात – चंद्रशेखर बावनकुळे
- Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकार 3 महिन्यात कोसळणार” ; संजय राऊतांची भविष्यवाणी