Ajit Pawar | “जाहिरात ‘योजना दमदार, जनतेचे हे सरकार’ अन् बस पार दळभद्री, अरे कशाला असले धंदे करता”

Ajit Pawar |  मुंबई : एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवरील जाहिरातीवरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार टीका केली आहे. एसटी बसेसच्या फुटलेल्या काचांचे फोटो दाखवत अजित पवारांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टीकेला प्रत्युत्तरही दिलं. अजित पवार आज विधानसभेच्या अधिवेशनात बोलत होते.

Ajit Pawar Comment On Eknath Shinde

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जाहीरातीसाठी सरकारच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपयांची उधळण केल्याचंही माहिती अधिकारातून स्पष्ट करण्यात आलं होतं. यावरुनही अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना धारेवर धरलं होतं. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले होते, “शिंदे-फडणवीस सरकारने कोट्यावधींच्या जाहिराती मागील सहा महिन्यात दिल्या. १७ कोटीहून अधिक रक्कम महानगरपालिकेच्या जाहिरातीवर खर्च केली.”

‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’-Ajit Pawar

“एसटीच्या मोडक्या, तुटक्या व भंगार बसवर राज्यशासनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ असा प्रकार आहे”, असे म्हणत अजित पवारांनी टीका केली आहे. तसेच, संबंधित एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे.

“अरे कशाला असले धंदे करता”

“एसटी बसेसवरील जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. ‘वर्तमान सरकार, भविष्यात आकार, योजना दमदार, जनतेचे हे सरकार’ अशी घोषणा जाहिरातीत आहे. मात्र, ज्या बसवर ही जाहिरात लावलीय ती बस प्रचंड दळभद्री आहे. त्या बसच्या काचा फुटल्या आहेत. अरे कशाला असले धंदे करता,” अशी टीका अजित पवार यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.