Ajit Pawar | “ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणं ही बेईमानी”, अजित पवारांचा शिंदे सरकारवर निशाणा
Ajit Pawar | शिर्डी : सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसून येतं आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटावर सडकून निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अजित पवार (Ajit Pawar)
ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी आहे आणि ती जनतेला पटलेली नाही, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटावर हल्ला केला आहे. कालापासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू होत आहे. त्यावेळी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत. ते नेते तसे बोलून दाखवत आहेत. ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. जनतेचा एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड राग आहे. बच्चू कडू यांनी एका वाहिनीवर मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणून पद मिळवले ते ठीक आहे, परंतु पक्षावर दावा करणे योग्य नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा योग्य नाही, असं म्हणत पवारांनी शिंदेंवर टीकाही केली आहे.
पुढे बोलताना अजित पवार असंही म्हणाले की, सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. फेब्रुवारी 2023 मध्ये पाच निवडणूका होत आहेत. याबाबत सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन चर्चा करण्यात आली आहे. या निवडणूका आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत. या पाचही जागा आघाडीच्या कशा येतील त्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची घेतली भेट !
- Deepak Kesarkar | “सकाळचा शपथविधी घेणारेच आता…”, दीपक केसरकरांचा अजित पवारांवर पलटवार
- Ajit Pawar | गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे चोरवाट ; अजित पवारांचा शिंदे गटाला
- Amol Mitkari | “रवी राणा यांना जिल्हाबंदी का केली नाही?”; अमोल मिटकरी यांचा खोचक सवाल
- Ajit Pawar | “सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा..”; अजित पवारांची सडकून टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.