Ajit Pawar | ज्योतिषाकडे जाण्यावरुन मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचा टोला, म्हणाले…

Ajit Pawar | पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकच्या दिशेने निघाले. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगाव येथील एका ज्योतिष्याकडे हात दाखवल्याची चर्चा आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदेंचे कान टोचले आहेत. 

अजित पवार म्हणाले, “आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतो मला समजत नाही. प्रत्येकाची कुठे ना कुठे निष्ठा असते, विश्वास असतो त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही.” मात्र, मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या बातम्या आल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे माहिती नाही. त्यामुळे वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केली पाहिजे, असंही पवार यावेळी बोलताना म्हणाले.

“ही आपली परंपरा आहे. त्याबद्दल आपल्या मनात आदराचं, श्रद्धेचं स्थान आहे. तिथंपर्यंत मी समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चाललं असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे”, असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

पुढे ते म्हणतात, “तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बदल होत आहेत. अशावेळी विज्ञान काय सांगतंय हे न पाहता पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. यावर काय बोलावं, आमच्यासारखे तर हतबलच झालेत.” दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.