Ajit Pawar | “ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का?”; अजित पवारांचा खोचक सवाल
Ajit Pawar | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavraj Bommai) यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले होते. मात्र काल झालेल्या बैठकीत बसवराज बोम्मई यांनी या संदर्भात खुलासा केला आहे.
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavraj Bommai) यांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत ज्या ट्विटर अकाऊंटवरून माझ्या नावाने ट्विट करण्यात आलं, ते ट्विटर अकाऊंट माझं नव्हतं, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे.
यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलंय. ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? याची शहानिशा करून दूध का दूध आणि पानी का पानी करावं. तसेच यामागचा मास्टरमाइंड शोधावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, “कारण नसताना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला आहे. त्यांनी विधाने केली नसती तर हे मुद्दे पुढे आले नसते. गाड्या फुटल्या नसत्या. मराठी भाषिकांना त्रास झाला नसता. महाराष्ट्राच्या बॉर्डरवरील गावांमध्ये महाराष्ट्र सोडण्याची भावना निर्माण झाली. ती झाली नसती. यातून कर्नाटक सरकारनेही समंजस भूमिका घ्यायला हवी. तर महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे.”
पुढे ते म्हणाले, काही जणांचं म्हणणं आहे की हे काम विरोधकांनी केलं. तशी संशयाची सूई व्यक्त केली आहे. आम्ही कधीच राज्याच्या, देशाच्या एकसंघतेला धक्का लावला नाही. चुकीचं काम होणार नाही हाच दृष्टीकोण सर्व राजकीय पक्ष ठेवत असतात. पण केंद्राला शंका वाटत असेल तर त्यांनी यामागचा मास्टरमाइंड शोधावा.”
महत्वाच्या बातम्या :
- Devoleena Bhattacharya | ‘या’ व्यक्तीसोबत देवोलीनाने बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर केला फोटो शेअर
- Eknath Shinde | अमित शाह, बोम्मईंसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- Sanjay Raut | सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण करू ; संजय राऊत यांचा इशारा
- Health Care | आवळा चूर्ण खाल्ल्याने मिळतात आरोग्याला ‘हे’ जबरदस्त फायदे
- Honda Electric Bike | होंडाची ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
Comments are closed.