Ajit Pawar | …तर मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन ; अजित पवारांचा भाजपला इशारा

Ajit Pawar | नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. रखडलेल्या कामावरुन तसेच विविध कामांना दिलेल्या स्थगिती वरून  सरकारला धारेवर धरले. विदर्भ, मराठवाडा, शेतकरी असे अनेक मुद्दे अजित पवार यांनी विधानसभेत मांडले. अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार शाब्दिक टोलेबाजी केली.

अजित पवार यांनी भाजप नेत्यांचे चांगलेच कान टोचले. “भाजपच्या नेत्यांमध्ये सर्वात ताकदवान देवेंद्र फडणवीस आहेत. कोणी किती गप्पा मारू द्या जे आहे ते आहे. त्यांनी काही लोकांना आता संधी दिली आहे. ते विधिमंडळाचे देखील सदस्य (चंद्रशेखर बावनकुळे) आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारने विदर्भ, मराठवाड्यासाठी काहीच केलं नाही, असे चित्र निर्माण केले. मात्र कितीही टीका झाली तरी सर्व विभागांमध्ये आम्ही काम केले,” असे अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले, “सप्टेंबर महिन्यात आपले नेते (चंद्रशेखर बावनकुळे) बारामतीत आले. ते म्हणाले बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार.  आमचं बारामतीत काम आहे, खरचं तिथे करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?. जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल. महाराष्ट्राला माहित आहे. मी एखाद्याचा चॅलेंज दिले ना तर मी कुणाचे ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही.”

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.