Ajit Pawar | “…तो पर्यंतच शिंदे सरकार टिकणार”, अजित पवारांचं भाकीत

मुंबई : राज्यात सध्या एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार आहे. शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंड केला आणि ते सत्तेत आले. यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. यावरुनच राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार यांनी वक्तव्य करत हे सरकार किती दिवस टिकेल याबबाबत भाकीत केलं आहे.

अजित पवार यांचं भाकीत –

शिंदे गटात आमदार अस्वस्थ आहेत, काही काळ थांबा, सर्वच समोर येईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणालेत. तसेच 145 चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत सरकार टिकणार, योग्य वेळेची वाट पाहतोय, असं अजित पवारांनी म्हलं आहे. एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, शिवसैनिकांना आवडलेलं नाही, असंही अजित पवार वारंवार सांगत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर –

याला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांमध्येच अस्वस्थता असल्याचं म्हणाले आहेत. विधानसभेच्या 288 जागा असून बहुमताचा आकडा 145 इतका आहे. शिंदें गटाकडे 40 आणि अपक्ष तसंच इतर 10 आमदारांसह 50चं संख्याबळ आहे. भाजपकडे स्वत: 106 आमदार आणि इतर 8 असे एकूण 114 आमदार होताच. म्हणजेच शिंदे-भाजप सरकारचं संख्याबळ होते, 164 आमदाराचं.

शिंदे – फडणवीस सरकारचा पवारांना झटका –

एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या अनेक निर्णयांवर बंदी घालण्यात आली. अशातच पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारकडून 850 कोटी रुपयांचा निधी रोखण्यात आला आहे. पुन्हा एकदा सरकारकडून 850 कोटी रुपयांचा निधी रोखण्यात आला आहे. याबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. 850 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.