Ajit Pawar | “…त्यापेक्षा त्यांनी सरळ रांगेत उभं राहावं”, अजित पवारांना ‘या’ आमदाराचा खोचक सल्ला

Ajit Pawar | मुंबई : दिवाळी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांमध्येही खूपच फटाकेबाजी पहायला मिळतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘100 रूपयांमध्ये दिवाळीचा शिधा’ या योजनेवरून राज्य सरकारवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

किशोर पाटीलांचा अजित पवार यांना (Ajit Pawar)

असं वाटतं की या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आपण स्वत: काही करायचं नाही. पण राज्यकर्ते जेव्हा काही करतात, तेव्हा त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू करायची, असं म्हणत किशोर पाटील यांनी अजित पवार यांना चांगलंच फटकरालं आहे.पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, लोक 100 रुपये देऊन हे किट घेऊन जात आहेत.

टीका करणाऱ्यांना कदाचित हे किट मिळत नाहीये. त्यामुळेच ते कदाचित आरोप करत आहेत. त्यापेक्षा आरोप करणाऱ्यांनी सरळ रांगेत उभं राहावं आणि त्यांनाही एकेक किट देण्याची व्यवस्था आम्ही करू, असं म्हणत किशोर पाटील यांनी अजित पवारांना एकप्रकारे खोचक सल्लाच दिला आहे.

अजित पवार यांचे वक्तव्य 

दरम्यान,योजना राबवत असताना त्याचं व्यवस्थित नियोजन करावंच लागतं. नियोजनशून्य कारभार केला, की अशा समस्या निर्माण होतात. काही गोष्टी आहेत, काही नाहीत. दिवाळी झाल्यानंतर सवलतीच्या दरातला शिधा मिळाला तर त्याचा काय उपयोग आहे? त्यांचे मंत्री सांगतायत की पोहोचलाय. पण अजिबात पोहोचलेला नाही. काहींनी सांगितलं की त्याचा काळा बाजार सुरू आहे. 100 रुपयांमधला शिधा कुणी 200 किंवा 300 रुपयांना विकत आहे. हे चुकीचं आहे. त्यात बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.