Ajit Pawar | “त्यामागे कोण मास्टरमाईंड हे..”; शीतल म्हात्रे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी अजित पवारांचं वक्तव्य
Ajit Pawar | मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा सोबतचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे. आज याच मुद्द्यावरुन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहतात”
“राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
Ajit Pawar talk about Sheetal Mhatre’s viral video
“कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे”, असंही अजित पवार म्हणाले.
धन्यवाद.. महिलांच्या आत्मसन्मानाकरिता आपण घेतलेल्या भूमिके स्वागत… @YaminiYJadhav ताई @AjitPawarSpeaks दादा pic.twitter.com/4Uiq137ZvL
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 13, 2023
भाजप आमदार यामिनी जाधवांची प्रतिक्रिया
“एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही अतिशय निंदनीय बाब आहे. हा व्हिडीओ पहिल्यांदा कुणी मॉर्फ केला त्याला शोधून काढावं. आज हा प्रकार आज एका आमदार आणि पहिलेबरोबर झाला, उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. कारण कुठलाही माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो ते आम्ही व्हिडीओत बघितलं. त्या उद्घाटनाला मीही उपस्थित होते. महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते”, असे यामिनी जाधव म्हणाल्या आहेत.
- Sheetal Mhatre | “शीतल म्हात्रेंचं आयुष्य बरबाद होईल”; व्हायरल व्हिडीओवर भाजप आमदार आक्रमक
- Rahul Gandhi | राहुल गांधींच्या ‘त्या’ भाषणावरुन संसदेत मोठा गदारोळ; काही काळ कामकाज तहकूब
- Eknath Shinde | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
- MNS Dilip Dhotre | संत चोखामेळा मंदिराचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा…
- MNS – Dilip Dhotre | संत चोखामेळा मंदिराचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.