Ajit Pawar | थांब रे बाबा, दादा पादा; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Ajit Pawar | मुंबई: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं आहे. अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. त्याचबरोबर या निर्णयाबद्दल पत्रकारांसोबत बोलत असताना अजित पवारांनी मिश्किल टिपणी दिली आहे.
पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले, “आपण सगळे पवार साहेबांना दैवत मानतो. त्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन ते तीन दिवस वेळ हवा आहे. त्यांना वेळ विचार करायला वेळ द्या. त्यांच्या या निर्णयाचा मान राखून सर्वांनी त्यांना दोन ते तीन दिवस विचार करायला वेळ दिला पाहिजे.”
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यांना मिश्किलपणे उत्तर देत अजित पवार म्हणाले, “थांब रे बाबा, दादा पादा.” त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे हास्य पसरले होते.
दरम्यान, “हट्टीपणा सोडा आणि साहेबांना विचार करायला वेळ द्या. तुम्ही जोपर्यंत घरी जात नाही, जोपर्यंत उपोषण थांबवत नाही तोपर्यंत पवार साहेब अंतिम निर्णय देणार नाही. कार्यकर्त्यांपेक्षा पवार साहेब जास्त हट्टी आहेत. त्यांना हट्ट करायला भाग पाडू नका. पवार साहेबांना विचार करायला वेळ द्या.” असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
शरद पवारांच्या या निर्णयावरून ज्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यांचे राजीनामे स्वीकारले जाणार नाही, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर आंदोलनासाठी बसलेल्या कार्यकर्त्यांना घरी जाण्याचे आवाहन देखील पवारांकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | शरद पवार निर्णयावर ठाम ! अजित पवारांनी केला खुलासा
- Prithviraj Chavan | राष्ट्रवादीची भाजप सोबत बोलणी सुरु आहे – पृथ्वीराज चव्हाण
- Sanjay Shirsath | तडकाफडकी राजीनामा देणे म्हणजे पक्षात फुट – संजय शिरसाठ
- Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यास तयार ; तर पवारांसमोरच अनेकांना झापलं !
- Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असणार? ‘या’ नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू
Comments are closed.