Ajit Pawar | “दिपक केसरकर म्हणातात की, गृहपाठच बंद करायचा! केसरकरजी…”, अजित पवारांच्या भाषणाने हशा पिकला

मुंबई : बारामती येथील प्रसिद्ध विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचा आज 50 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार आणि टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी अजित पवार यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि या शिक्षण संस्थेतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या या भाषणाने सभागृहात चांगलाच हशा पिकला.

विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवताना मुलांच्या कपाळाला आठ्या पडल्या नाही पाहिजेत, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच कुणी चुकत असेल तर त्याला सांगा, आपण समजावून सांगू, नाही ऐकलं तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवा, काही अडचण असल्यास आम्हाला सांगा. विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही बांधिल आहोत, असं देखी अजित पवार म्हणाले.

यादरम्यान, मी सुद्धा अर्थमंत्री होतो, पण कुणावर गंडांतर येईल असे निर्णय कधी घेतले नाही, आता दिपक केसरकर म्हणातात की, गृहपाठच बंद करायचा! केसरकरजी असं कसं चालेल, असा टोला त्यांनी लगावला. तसेच सरकारला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर लक्ष द्यावंच लागेल, उद्या सरकारने काही चुकीचा निर्णय घेतला तर आपल्याला लोकांसाठी पुढे यावे लागेल, असं आवाहन देखील त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, आल्या भाषणाचा शेवट करताना मी आता माझं भाषण आवरतं घेतो, नाहीतर लोक म्हणतील ह्याच्या हातात माईक दिला की सोडतच नाही!, असं पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.