Ajit Pawar | “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये” : अजित पवार

Ajit Pawar | सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक निवडणुक दरम्यान निपानीमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसवर ( NCP) टीका केली होती. तसचं त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देखील भाष्य केलं होतं. तर आज (8 मे) शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना फडणवीसाच्या टीकेवर शरद पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिलेलं आहे. याचप्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील देवेंद्र फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला.

काय म्हणाले अजित पवार ( What did Ajit Pawar say)

अजित पवारांनी आज सातारमधील जाहीर सभेला उपस्थित लावली होती. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकार आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका- टिपण्णी केली. तर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. जे राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. अशी टीका केली होती त्याच्या या टीकेचा अजित पवारांनी समाचार घेत म्हटलं की, देवेंद्रजीनी आमच्या लोकांची काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या लोकांचं बघावं. अशी सडकून टीका केली. तर प्रत्येकजण म्हणतोय आमच्या सरकारला धोका नाही, परंतु तसं नाही परिस्थिती वेगळी असल्याची माहित अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. यामुळे आमच्या लोकांची काळजी करू नये. असं अजित पवार म्हणाले.

तसचं शरद पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीसांनी निपाणीमध्ये येऊ उत्तरं देणार असल्याचं म्हटलं होत. यामुळे शरद पवारांनी निपाणीतुन देखील भाजपवर निशाणा साधला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील फडणविसांवर हल्लाबोल करत म्हटलं की, भारतीय जनता पक्षाने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे आणि तुम्ही आमची मापं काढावी का? असं पाटील म्हणालेत. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाली असून भाजप आणि फडणवीसांना प्रतिउत्तर देताना पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.