Ajit Pawar | निवडणुका गुजरातमध्ये मग महाराष्ट्रातील कामगारांना सुट्टी का? ; अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar | मुंबई : गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुट्ट्या देण्य्यात आल्या. त्यामुळे अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “पहिल्यांदाच एक बघायला मिळालं. सरकारने काय करावं, हा सरकारचा निर्णय आहे. परंतु शेजारच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. म्हणून आपल्या राज्यातील ठरावीक जिल्ह्यांमध्ये सुट्टी देण्यात आली. दर पाच वर्षांनी निवडणुका येतात पण मला आठवत नाही आम्ही सत्तेत असताना अशा सुट्ट्या देण्यात आल्या. अशा प्रकारचे आदेश पहिल्यांदाच काढलेले पाहायला मिळतात,” असे अजित पवार म्हणाले.

राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका – 

अजित पवार म्हणाले, “ज्ञानेश्वर माऊली संजीवनी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विचारांमधील अंधार दूर होऊ दे, त्यांच्या वक्तव्यामधला गोंधळ संपवू दे, महाराष्ट्राच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे, अशी प्रार्थना मी करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी चिड येणारे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या मी तीव्र निषेध करतो. राज्यपाल महोदय वारंवार असं का बोलतात, का वागतात. सत्तारुढ मान्यवर यावर का गप्प बसतात?. हे महाराष्ट्र राज्याला पडलेलं कोड आहे.”

“मी राज्यपालांना विरोधी पक्षनेता म्हणून भेटू शकतो. मी त्यांना उपमुख्यमंत्री होतो तेव्हा देखील भेटायला जायचो. मला बऱ्याचदा राज्यपाल म्हणायचे, अजितजी अभी बस, अभी मुझे जाना है. मी म्हणायचो वरिष्ठांना सांगा आणि जा. त्यांना जायचे आहे आणि मात्र वरिष्ठ परवानगी देत नाहीत. त्यामुळे राज्यपाल अशाप्रकारची वक्तव्य करत आहेत का?, अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होत आहे,” असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.