Ajit Pawar | पहाटेच्या थपथविधीबाबत जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, त्यावर अजित पवार म्हणाले…
Ajit Pawar | जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या झालेल्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. हा विषय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
‘अजित पवारांनी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली’ अशा अर्थाचे वक्तव्य जयंत पाटलांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील नेतेमंडळींनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आणि आता स्वत: अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यामध्ये पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता अजित पवारांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले असून हा सगळा प्रकार शरद पवारांच्या खेळीचा भाग असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये पत्रकारांनी अजित पवारांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळल्याचे पाहायला मिळत आहे. “त्यावेळी मी स्वत: म्हटलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Prakash Ambedkar | “सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धवजींनी दिला तर मानेल…”; प्रकाश आंबेडकर-राऊत यांच्यात जुंपली
- Prakash Ambedkar | “…तर आम्ही भाजपसोबतही युती करू”; आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य
- Nana Patole | वंचितच्या युतीबाबत महाविकास आघाडीत मतभेद?; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
- Prakash Ambedkar | “भांडण लावणं हा भाजपचा फंडा”; पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आंबेडकरांची टीका
- Chandrakant Patil | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं ‘ते’ वाक्य ठरलं खरं??
Comments are closed.