Ajit Pawar | “बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का”; अजित पवारांची सडकून टीका 

Ajit Pawar | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavraj Bommai) यांची विशेष बैठक बोलावली होती.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर काल दिल्ली येथे झालेल्या बैठकीसंदर्भात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. सध्या सीमाप्रश्न अधिक पेट घेण्यामागे विरोधकांचा हात असावा अशी काहींना शंका वाटत असेल तर सत्ताधाऱ्यांनी या मागचा शोध घेऊन दूध का दूध और पानी का पानी करावं, अशी मागणी अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे.

अजित पवार म्हणाले की, “बोम्मई यांनी दिल्लीतील बैठकीत सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी. जे ठरलंय त्याप्रमाणे बोम्मईंनी वागलं पाहिजे. राज्याच्या एकात्मतेला धक्का लागेल, असं आम्ही कधीच वागलो नाही. बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं, तर हा वाद वाढला नसता. बोम्मईच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं.”

पुढे ते म्हणाले, आम्ही सत्तेत आणि विरोधात काम केल आहे, आम्ही कधीही राज्याच्या किंवा देशाच्या एकसंधतेला धक्का लागणार नाही, कोणती चुकीची गोष्ट आमच्याकडून घडणार नाही हा दृष्टीकोन आमचा आहे. हा प्रश्न सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे, यासाठी महाराष्ट्राच्या बाजूने आपली बाजू अतिशय चांगल्याप्रकारे मांडण्यासाठी राज्य सरकारने हरीश साळवे यांच्यासारख्या वकीलाची नेमणूक करावी.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.