Ajit Pawar | “भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावणे हास्यस्पद” ; रामदास आठवलेंचा अजित पवारांना टोला

Ajit Pawar | सांगली: गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे. यामध्ये अजित पवार 2024 मध्ये नाही, तर आत्ताच मुख्यमंत्रीपदावर असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर अजित पवारांचे जागोजागी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरही लावण्यात आले आहे. यावरून अनेकांनी पवारांवर खोचक टीका केली आहे.

रामदास आठवलेंचा अजित पवारांना टोला (Ramdas Athawale’s taunt to Ajit Pawar)

पोस्टर प्रकरणावरून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील अजित पवारांवर टीकास्त्र चालवले आहे. “मलाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं”, असं आठवले यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावणे हे हास्यस्पद आहे, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे.

धाराशिव येथे अजित पवारांचे (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले होते. यावरूनही अजित पवारांनी पोस्टर लावणाऱ्यांना फटकारलं आहे. “अशा प्रकारचे बॅनर्स लावू नये, बॅनर्स लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही”, असं अजित पवार पोस्टर प्रकरणावर म्हणाले आहे.

आपल्या आमदारांची संख्या वाढवा, आपल्या विचारांचे आमदार निवडून आले त्याचबरोबर वरिष्ठांचे आशीर्वाद लाभले आणि आमदारांनी पाठिंबा दिला, तर नक्कीच हे होऊ शकतं , असेही अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.