Ajit Pawar | “मंत्री गुंडांना सोबत घेऊन फिरतात”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर जहरी टीका
Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा लाऊडस्पीकरचा प्रचाराची वेळ आजपासून थांबली आहे. भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कसब्यात ‘रोड शो’ केला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
Ajit Pawar ciritice on CM Eknath Shinde Rally
“महाराष्ट्रात यापूर्वी अनेक पोटनिवडणुका पार पडल्या. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणुकीत ‘रोड शो’च्या निमित्ताने फिरावं लागलं”, अशी जहरी टीका अजित पवारांनी केली आहे. पुण्यात प्रचारानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवरुन ताशेरे ओढले आहेत.
“मंत्री गुंडांना सोबत घेऊन फिरतात”- Ajit Pawar
“गुंडांना सोबत घेऊन काही मंत्री फिरत आहेत, अशा बातम्या देखील पाहायला मिळाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांवर हल्ला झाला. बिहार, युपीसारखं होत चाललं आहे. तिथे अशा घटना घडतात असं आम्ही ऐकलं होतं. “हे म्हणत होते निवडणूक एकतर्फी आहे. पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आले ते पाहता ही निवडणूक चुरशीची झाली. आम्हाला दोन्ही ठिकाणी यश मिळेल हा विश्वास आहे”, असा दावा अजित पवारांनी यावेळी केला आहे.
सत्तासंघर्षाच्या लढाईवर भाष्य
“महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सतत सुनावणी होत असून नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. असं असताना निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हाचा निर्णय आताच तडकाफडकी का दिला? याचादेखील विचार करण्याची गरज आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे.
“ही लढाई संपूर्ण महाराष्ट्राची”
“ही लढाई केवळ शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांची नाही. ही लढाई संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि लोकशाहीच्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं याकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज आहे”,असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Uddhav Thackeray | ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग; भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनिती
- Eknath Shinde | ‘आले रे आले गद्दार आले’; पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत घोषणाबाजी
- Shahaji Bapu Patil | “संजय राऊतांचं आडनाव आगलावे करा”; शहाजी बापू पाटलांची बोचरी टीका
- Sharad Pawar | “मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील…”; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया
- Chandrashekhar Bawankule | “शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत?”; बावनकुळेंचा संतप्त सवाल
Comments are closed.