Ajit Pawar | मविआ नेत्यांकडून अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप
Ajit Pawar | सोलापूर: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अजित पवारांवर टीकास्त्र चालवलं आहे. गेल्या सहा महिन्यापासून अजित पवारांचा भाजपशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. उलट महाविकास आघाडीतील नेतेच अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मोठे नेते आहेत. ते जिथे जातात तिथे गर्दी होते. मात्र, गर्दीवरून निवडणुकीचा पॅरामीटर ठरत नाही. त्याचबरोबर अजित पवार गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाच्या संपर्कात नाही. उलट महाविकास आघाडीतील नेते अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करून त्यांना डॅमेज करत आहेत.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना कोणी राजीनामा मागितला होता का? त्यांनीच राजीनामा दिला त्यांनीच समिती स्थापन केली आणि पुन्हा त्यांनीच राजीनामा मागे घेतला. हे तीन दिवसांचं नाटक होते.” राजीनामा दिलाच होता तर तो माघारी का घेतला? असा प्रश्न देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर देखील घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करत बावनकुळे म्हणाले, “बाळासाहेब लढवय्ये होते. पण उद्धव ठाकरे रडोबा झाले आहेत. लोकांना रडोबाचे राजकारण चालत नाही. त्याचबरोबर रडोबाच्या राजकारणात विकास होत नाही. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | कोकणकरांनो सावध! आर्द्रतेमुळे वाढणार ‘हीट इंडेक्स’
- Karanatka Election Result | कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात ; तर काँग्रेस आघाडीवर!
- Narayan Rane | “उद्धव ठाकरेंनी भाजपचं मंगळसूत्र घातलं नंतर शरद पवारांचा हात धरून गेले” : नारायण राणे
- Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर नाना पटोलेंचा पलटवार ; म्हणाले..
- Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं परमबीर सिंग यांचं निलंबन मागं घेण्याचं कारण, म्हणाले…
Comments are closed.